UBN News Network Washim.
वाशीम रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाईक घेण्यासाठी आलेल्या युवकाला पार्किंग ठेकेदाराने थेट पोलिसांच्या समोरच अश्लील भाषा केली, आणि हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागरिकांमध्ये संतापाची लाट उठली असून ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
माहितीनुसार, युवकाची बाईक ट्रेनमध्ये बसलेल्या व्यक्तीकडे ठेवण्यात आली होती, पण पावती त्याच्याकडे नव्हती. बाईक घेण्यासाठी युवक पार्किंगमध्ये आला असता ठेकेदाराने त्याला अडवले. युवकाने नम्रतेने विनंती केली,
"सीसीटीव्ही कॅमेरे तपासा. आम्हीच बाईक ठेवली होती का ते पाहा आणि मग गाडी द्या."
या विनंतीवर ठेकेदाराने उद्धट आणि अश्लील भाषेत उत्तर दिले,
"कॅमेरे तपासायला तुझ्या बापाचे नोकर आहोत का आम्ही?"
युवक शांत राहून म्हणाला, "गाडी दिली नाही तर पोलिसांना बोलवावे लागेल."
ठेकेदार या उत्तरावर अजून भडकला आणि आपल्या सहकाऱ्याला आदेश दिला, "पाईप काढा, कोणता पोलिस येतो ते आणा." व्हिडिओत ठेकेदाराने पोलिसांविषयीही अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे.
रेल्वे स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक सेवा मिळणे अपेक्षित असते. मात्र या ठेकेदाराच्या दादागिरीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक महिला आणि मुलींना थेट धमकावल्याची तक्रार आहे, तर काहींना लोखंडी रॉडसह मारहाणी करण्याचा प्रयत्नही झाल्याचे सांगितले जाते.
स्थानिक नागरिक आणि प्रवासी ठेकेदारावर त्वरित कठोर कारवाई व्हावी, त्याचा परवाना रद्द करावा, तसेच पोलिसांनी व्हिडिओची सत्यता पडताळून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आहेत. आता पाहावे लागेल की पोलीस आणि रेल्वे प्रशासन या प्रकरणात कोणती पावले उचलतात.

Facebook
0 Comments