प्रजासत्ताक दिन फोटो.
प्रतिनिधी रिसोड: सुखदेव तायडे. =
खडकी सदार येथील स्व.किसनराव सदार विद्यालयांमध्ये आज 26 जानेवारी म्हणजेच 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ स्वाती ज्ञानेश्वर सदार अध्यक्षा (संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ खडकी सदार) प्रमुख पाहुणे श्री संजू भाऊ सदार( उपाध्यक्ष संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ खडकी सदार) तसेच संदीप भाऊ सदार( सचिव संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ खडकी सदार )प्रमुख मार्गदर्शक जाधव सर (मुख्याध्यापक )प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील सदार , दीपक भाऊ सदार गणेश भाऊ सदार , सचिन सदार, (तंटामुक्ती अध्यक्ष)श्री वायाळ सर , बकाल सर फुपाटे सर, वाठोरे सर (स्काऊट शिक्षक,) खडसे सर मंगेश कोरडे ,माधव मार्कड , शंकर सदार, (पत्रकार) हरिभाऊ बाजड, एकनाथ सदार ,राजू भारते, सुरेश सदार,भागवत सदार, संदीप सदार लोडूजी धांडे, संदीप भाऊ धांडे ,विजय धांडे, दिलीप चोकटे, शिवा काका सुरुशे. माधव पाटील सदार ,ओम प्रकाश धांडे,कार्तिक सदार (माजी विद्यार्थी.)इत्यादी नागरिक उपस्थित होते, सर्वप्रथम सर्व विद्यार्थी प्रांगणामध्ये जमा झाले, मान्यवराच्या हस्ते महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व ध्वजारोहण, ध्वजाला वंदन करण्यात आले, त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. क्रीडाशिक्षक वायाळ सर यांनी सुंदर अशी कवायत विद्यार्थ्यांकडून सादर करून घेतली, त्यानंतर स्वागत गीत घेऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये काही विद्यार्थ्यांनी 26 जानेवारी विषयी माहिती दिली वर्ग दहावीची विद्यार्थिनी वैष्णवी दिलीप सदार हिने आक्रमक भाषण देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आलेल्या सर्व मान्यवरांनी तिचे फार कौतुक केले. त्यानंतर शालेय क्रीडा स्पर्धा, प्रश्न निर्मिती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या स्पर्धेच्या विजयी विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच मागच्या वर्षीच्या दहावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक पटवणारी कुमारी धरती भिसे हिला श्री संदीप भाऊ सदार (सचिव संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ) यांच्या वतीने बक्षीस म्हणून रोख रक्कम 1001 प्रदान करण्यात आली .कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जाधव सर (मुख्याध्यापक)यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणांमध्ये सध्याची चालू परिस्थिती, दोन देशांमधील अंतरिक वाद, बांगलादेशातील वाद ,आतंकवाद, धर्मवाद अशा ज्वलंत मुद्द्यावर प्रकाश टाकला व सर्वांचे लक्ष वेधून घेतले, कार्यक्रमांमध्ये गणेश भाऊ सदार, दीपक भाऊ सदार ,तसेच संजय भाऊ सदार यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्याअध्यक्षा सौ स्वाती ज्ञानेश्वर सदार यांनी आपल्या भाषणामध्ये संविधान निर्मिती कशी झाली, संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व काय आहे हे सर्वांना पटवून दिले, त्यांनी सांगितले की ज्या देशातील महिला जागरूक असतील त्या देशाची प्रगती लवकर होते भारतातील महिला ह्या सर्व क्षेत्रांमध्ये पुढे येत आहे व भविष्यामध्ये भारत हा विकसित देश म्हणून गणल्या जाईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री फुपाटे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील सदार यांनी मानले अशा प्रकारे आमच्या विद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Facebook
0 Comments