Top News

वाशिमचा लाडका बालवैज्ञानिक दिव्यांग विराज शिंदे याने वाशिमचे नाव सुवर्णाक्षरांनी दिल्लीत कोरले!

 दिल्ली : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन (NIF) यांच्या वतीने नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित १२ व्या राष्ट्रीय 'इन्स्पायर मानक' प्रदर्शनात वाशिमच्या विराज शिंदे याने ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम टॉप-६० (Top-60) उत्कृष्ट उपक्रमांमध्ये स्थान मिळवले आहे. या संपूर्ण प्रवासात पावलोपावली आलेल्या प्रचंड असहकार आणि संघर्षाला आपल्या अद्भूत जिद्दीने चोख उत्तर देत, अत्यंत लहान वयात (Tender Age) हा राष्ट्रीय बहुमान मिळवणारा तो देशातील एकमेव ऑर्थोपेडिक दिव्यांग विद्यार्थी ठरला असून, केंद्रीय कॅबिनेट मंत्री डॉ. गजेंद्र सिंग, NIF चे संचालक डॉ. अरविंद सी. रानडे आणि मुख्य वैज्ञानिक डॉ. बिपिन कुमार यांच्या हस्ते दिल्लीत त्याचा विशेष गौरव करण्यात आला. विराजने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या "धान्याचा प्रत्येक कण न् कण मोलाचा आहे" या तत्त्वाला प्रमाण मानून सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त असे 'कणगी: अ ग्रेन प्रोटेक्टिव्ह केअर युनिट' हे रासायनिक प्रक्रिया विरहित (Chemical-free) धान्य केअरिंग युनिट विकसित केले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या धान्य साठवणुकीच्या समस्या संपून सर्वांनाच विषमुक्त आणि शुद्ध अन्न मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ऑर्थोपेडिक दिव्यांगत्वाचे शारीरिक आव्हान आणि व्यवस्थेकडून मिळालेल्या तीव्र असहकारावर मात करत, बाल समुपदेशक व लेखक म्हणूनही ख्याती असलेल्या विराजने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश सर यांनी देखील यापूर्वी त्याचे विशेष कौतुक करून पाठीवर कौतुकाची थाप दिली होती; अत्यंत कमी वयात सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एवढी मोठी वैज्ञानिक झेप घेणारा तो या प्रदर्शनातील एकमेव बालवैज्ञानिक ठरल्याने संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच, विराजने आपल्या या यशाचे सर्व श्रेय हे सामान्य वाशिमच्या जनतेला देऊन सर्व वाशिमकर नागरिकांचे जाहीर आभार मानले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने