Advertisement

गणेश चतुर्थीनिमित्त कला शिक्षक राजेश गोटे यांच्या अनोख्या शुभेच्छा.


प्रतिनिधी स्वाती गायकवाड 
तोंडगाव, दि. १४ सप्टेंबर २०२६ : गणेश चतुर्थी व गणेश उत्सवानिमित्त श्रीकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तोंडगाव येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आदर्श कला शिक्षक मा. श्री. राजेश गोटे सर यांनी आपल्या कलाकृतीतून भाविकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
 सरांनी फळ्यावर साकारलेल्या सुंदर चित्रातून श्री गणपती बाप्पांचे दर्शन, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची प्रेरणा आणि देशसेवेचा संदेश प्रभावीपणे मांडला आहे. तसेच “कपडे फाटले असोत जरी, स्वप्ने ठेवावी उंच हीच खरी” या प्रेरणादायी विचारातून परिस्थिती कोणतीही असो, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करावी, असा संदेश दिला आहे. 
गोटे सरांच्या या कलाकृतीचे परिसरातून कौतुक होत असून, “गणपती बाप्पा मोरया” अशा जयघोषात त्यांनी सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने