Top News

शिवगायन स्पर्धेत स्वरविहारचा तृतीय क्रमांक

बुलडाणा | प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित पोवाडा व शिवगायन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत स्वरविहार संगीत विद्यालयाने खुल्या गटात उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली होती. खुल्या गटात सहभागी झालेल्या स्वरविहारच्या पथकाने ‘जिजाऊंचा तो पुत्र लाडका झाला छत्रपती’ हे गीत सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. स्पर्धेत डॉ. मिलिंद जाधव, अ‍ॅड. अमोल देशपांडे, शारदकुमार ठाकूर, अभय झनके, डॉ. मंजुश्री खोब्रागडे, ज्योती खरे, वैशाली मोरे, शिल्पा डाबेराव, राजश्री उबाळे, प्राजक्ता जाधव आणि कल्पना तायडे यांनी सहभाग नोंदविला.

संवादिनीची साथ रविकिरण मोरे यांनी तर ढोलकीची साथ शांतनू सरदार यांनी दिली. स्पर्धकांना स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा. रविकिरण मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

विजयी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, रोख २८०० रुपये व प्रशस्तीपत्र देऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभपर्वावर सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. विविध क्षेत्रांतून विजयी स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

📄 अधिकृत PDF डाउनलोड करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने